सोमवारपासून पावसाचा हा जोर बऱ्यापैकी कमी होणार…

bpcauthor
0 Min Read

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर-पूर्व भारतासह मध्य भारत आणि विदर्भाला पावसाने जोरदार झोडपले.

आता हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू विरून जात गुजरातच्या दिशेने सरकत आहे. याच प्रणालीच्या प्रभावामुळे रविवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने अधूनमधून जोरदार हजेरी लावली.

मात्र, सोमवारपासून पावसाचा हा जोर बऱ्यापैकी कमी होणार असून, केवळ हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Share This Article