नो एन्ट्रीत दुचाकी चालवल्याने भीषण अपघात; एकाचा मृत्यू

1 Min Read

दि.०६(पीसीबी) – बीआरटी लेनमध्ये चुकीच्या बाजूने दुचाकी चालवून बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री ८.४० वाजता, शिवार चौक, रहाटणी येथे घडली.

सागर भागवत देवरे (३०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपीएल चालक नागेश लक्ष्मण गायकवाड (२८, दिघी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी चालक अभिषेक पुंडलीक शेरमाळे (२६, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक हा बीआरटी लेनमध्ये ‘नो एन्ट्री’ असताना आपली दुचाकी वेगाने चालवत होता. समोरून बस येत असल्याचे पाहून त्याने ब्रेक मारला असता गाडी घसरून बसच्या बंपरला धडकली. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेला सागर देवरे याचा मृत्यू झाला, तर आरोपीचा पाय फॅक्चर झाला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Share This Article