पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

1 Min Read

महाळुंगे, दि. 03 (पीसीबी) : पीएमपी बसने दुचाकला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. 2) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारात चाकण-तळेगाव रोडवर महाळुंगे येथे घडला. नितीन बापूराव शिंदे (वय 37, रा. नानेकरवाडी, खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन बबन बोनवटे (वय 37, रा. मेदनकरवाडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपी बस चालक किसन तुकाराम चव्हाण (वय 35, रा. दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचा मित्र नितीन शिंदे त्यांच्या दुचाकीवरून चाकण येथून महाळुंगे येथे कामावर जात होते. चाकण तळेगाव रोडवरून जात असताना भरधाव पीएमपी बसने नितीन शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नितीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article