अनैतिक संबंध असल्याचा संशय आला; त्याने उचलले टोकाचे पाऊल

bpcauthor bpcauthor
1 Min Read


हिंजवडी, दि. १८ (पीसीबी) : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 18) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रवीण महतो (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीवकुमार महतो आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील बावधन चौकी जवळ असलेल्या एका नर्सरी मध्ये प्रवीण महतो याचा धारदार हत्याराने झोपेत असतानाच गळा चिरून खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी सूत्रे हलवून तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीसोबत प्रवीण महतो याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून त्याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून प्रवीणला ठार मारण्याचा विचार केला. प्रवीण झोपेत असताना त्याचा गळा चिरून खून केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article