शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

PCB Admin
1 Min Read

हिंजवडी, दि. 12 (प्रतिनिधी)

शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यक्तीची 22 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडला.

याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8865083629, 8791866394 क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यावरून 22 लाख 68 हजार 580 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article