क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्या सामाजिक कार्यात आद्य क्रांतीवीर लहूजी वस्ताद यांचे मोलाचे योगदान – पद्मश्री दादा इधाते

PCB Admin
2 Min Read

पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२६ : – क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या कार्याला आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांनी संरक्षण आणि पाठबळ दिले तर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीत लहूजी वस्ताद यांनी सहकार्य केले असल्याचे मत पद्मश्री दादा इधाते यांनी व्यक्त केले.

 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर करणाऱ्या तीन दिवसीय क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटनही उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पद्मश्री दादा इधाते मार्गदर्शन करताना बोलत होते.

लहूजी वस्ताद यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणत स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेच्या विचारांसाठी कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक क्रांतिकारक आणि समाजपरिवर्तनाचे नेतृत्व करणारी माणसे घडली. म्हणूनच त्यांना ‘आद्य क्रांतिगुरू’ असे संबोधले जाते. अशा महापुरुषांचे कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जयंती आणि विचार प्रबोधन पर्व मोठ्या प्रमाणात आयोजित होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
अभिवादनाच्या वेळी आमदार अमित गोरखे, महेश लांडगे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, जेजुरी संस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे,भाऊसाहेब अडागळे,नाना कांबळे, संजय धुतडमल,नितीन घोलप,युवराज दाखले,उत्तम सकटे ,मारुती सोनटक्के,सतीश भवाळ,संजय ससाणे,सुनिल भिसे,भगवान शिंदे,विशाल कसबे, बाळासाहेब रसाळ,प्रसाद केसरे,बाळासाहेब खंदारेआणि मान्यवर उपस्थित होते.
प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळी निलेश देवकुळे यांनी प्रबोधनात्मक गीतगायन सादर केले. त्यानंतर बापू पवार यांनी ‘लेखणीचा बादशहा’ हा कार्यक्रम सादर केला. सायंकाळच्या सत्रात अनिकेत जवळेकर यांच्या प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम झाला. तर शाहीर शैलेश लोखंडे यांनी ‘देशभक्तिपर गीते, अभिमान महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 महापुरुषांचे कार्य, त्यांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रबोधन गीतांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर २०२६ पर्यत या चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपाशेजारी हे विचार प्रबोधन पर्व सुरू राहणार आहे.नागरिकांनी या पर्वातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Share This Article