पादचारी महिलेचे दीड लाखाचे गंठण हिसकावले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दिघी, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख 57 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. ही घटना शुक्रवारी दिनांक 9 रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास परांडे नगर दिघे येथे घडली.याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या नातेवाईकांसोबत सिद्धिविनायक कॉलनी नंबर एक परांडेनगर, दिघी येथे पायी चालत जात होत्या. त्यावेळी त्यांच्यासमोरून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 45 ग्रॅम वजनाचे एक लाख 57 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. दुचाकी वरील आरोपी सिद्धिविनायक कॉलनीतून आळंदीच्या दिशेने पळून गेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article