घंटागाडीच्या धडकेत महिला जखमी

1 Min Read

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) – कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीच्या धडकेत एक महिला जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री नऊ वाजताच्या सुमारास ओमकार गार्डन चौक, बावधन येथे घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घंटागाडीवरील अनोळखी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने पायी चालत जात असताना कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरील चालकाने त्याच्या ताब्यातील घंटागाडी पिकप निष्काळजीपणे पाठीमागे घेतले. त्यात फिर्यादी यांना पिकअपची धडक बसली. फिर्यादी यांच्या गुडघ्याला, डोक्याला मार लागला आहे. अपघात झाल्यानंतर आरोपी पिकअप घेऊन पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article