पाठलाग करत महिलेचा विनयभंग

1 Min Read

भोसरी, दि. २८ (पीसीबी) -विवाहित महिलेचा पाठलाग केला. तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेचा पाठलाग केल्याबाबत तिच्या पतीने जाब विचारला असता पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना गवळी नगर, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राम कोळी (रा. गवळी नगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे फिर्यादी महिलेसोबत असलेले संबंध पुन्हा सुरु ठेवण्यासाठी तसेच मैत्री व जवळीक साधण्यासाठी महिलेचा पाठलाग केला. आरोपीसोबत जवळीक न केल्यास दोघांच्या संबंधाबाबत महिलेच्या पतीला सांगणार, अशी आरोपीने धमकी दिली. 25 ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी महिला बेकरीमधून मुलीसोबत घरी जात असताना आरोपीने महिलेला अडवले आणि बोलण्याचा प्रयत्न केला. महिलेने घडलेला प्रकार पतीला सांगितलं. 26 ऑगस्ट रोजी रात्री महिला आणि तिचे पती घरी जात असताना आरोपी महिलेकडे पाहत असल्याने पतीने आरोपीला जाब विचारला. त्यावरून आरोपीने पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article