शाहूनगर येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणा-या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री डी वाय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, शाहूनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलीला क्लासवरून घरी घेऊन येत होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 80 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले.

Share This Article