दुचाकीची चावी न दिल्याने बियरची बाटली डोक्यात फोडून कोयत्याने वार

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – दुचाकीची चावी दिली नाही, या कारणावरून तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. त्यानंतर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला हे घटना बुधवारी (दि. 27) रात्री वाल्मिकी चौक, नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

हरीश अरुण गुरखा (वय 25, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज जैस्वाल (वय 30, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून वाल्मिकी चौक येथे बसण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीकडे दुचाकीची चावी मागितली. चावी देण्यासाठी फिर्यादींनी नकार दिला असता आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात बियरची बाटली मारून जखमी केले. त्यांनतर कोयता आणून फिर्यादीवर वार करून त्यांना गंभीर जखमी करत खुनाचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article