वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी गणेश म्हाळसकर यांची निवड

PCB Admin
1 Min Read

मावळ,दि.३०(पीसीबी) – वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश सोपानराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील ढोरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते.

गणेश म्हाळसकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज वैध ठरल्याने सभेत गणेश म्हाळसकर यांची निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केली. यावेळी उपनगराध्य पूनम जाधव, गटनेते राजेंद्र कुडे, नगरसेवक, नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article