ॲास्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने निर्णय बदलला, ३७ लाखांची मदत पिएम केअर्स फंड ऐवजी ‘या’ संस्थेला…

0
316

मुंबई, दि.०५ (पीसीबी): आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने पीएम केअर्स फंडामध्ये देणगी देण्याचा निर्णय बदलला आहे. त्याने आता ५० हजार डॉलर्सची (भारतीय चलनानुसार सुमारे ३७ लाख रुपये) रक्कम पीएम केअर्स फंड ऐवजी कोरोना पीडितांसाठी काम करणाऱ्या युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या इंडिया कोव्हिड-19 क्रायसिस अपीलला दिली आहे.

26 एप्रिल रोजी कमिन्सने पीएम केअर फंडाला ५० हजार डॉलर्सची मदत जाहीर केली होती. विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल, असे त्याने धोषीत केले होते. आयपीएलमधील आपल्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन कमिन्सने यापूर्वी केले होते. याबाबतीत सोनल मिडीयावर ट्विट करत कमिन्स म्हाणाला की, “गेली अनेक वर्ष भारतात येतोय आणि मी या देशाच्या प्रेमात पडलो आहे. येथील लोक माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. कोरोना संकटाच्या काळात अनेकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएल खेळवणे योग्य की अयोग्य यावर सध्या चर्चा सुरू आहेत. मी भारत सरकारला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळात आयपीएलमुळे किमान चार तास तरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे.”

परंतु आता त्याने त्याचा विचार बदलला आहे. त्याने त्याची मदत ही पीएम केअर्स ऐवजी युनिसेफला देण्याचे ठरवले आहे. दि. ३ मे रोजी कमिन्सने ट्विट द्वारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) भारतातील कोव्हिड-19 पीडितांना मदत करण्याच्या पुढाकाराचे स्वागत केले. तसेच “मी युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या भारतातील कोव्हिड -19 क्रायसिस अपीलसाठी माझं योगदान दिलं आहे.” असे त्याने म्हणेल आहे.