७६ बोटीव्दारे बचाव कार्य सुरू; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती

0
598

सांगली, दि. ९ (पीसीबी) – सांगली जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थीती हाताळण्यासाठी ७६ बोटी उपलब्ध असून यामध्ये एनडीआरएफ पथकाकडील ४२, पुणे, चिंचवड महानगरपालिका पथकाकडील २, सोलापूरकडून १२, कोस्टल गार्डकडील १, महाबळेश्वरकडील ६, राजारामबापू सहकारी साखर कारखाना वाळवा यांच्याकडील १, ग्रामपंचायत २ व आर्मीच्या ६ यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सध्या सांगलीवाडी परिसरात जवळपास ३ हजार अन्न पाकिटे हेलिकॉप्टर व बोटीव्दारे पोहोचविण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त शहरासाठी जवळपास ५ हजार अन्न पाकीटे व पाण्याच्या बॉटल्स बोटीव्दारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचविण्यात येत आहेत. पाणीपातळी ५७.४ फूट असून ती कमीही होत आहे. तरी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. कोणीही घाबरून जावू नये. जिल्हा प्रशासनातर्फे पूरस्थिती हाताळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत.

आपत्कालील स्थितीत मदत हवी असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा – 9370333932, 8208689681.