२४ कॅरेट गोल्ड प्लेटेडसह शाओमीचा एमआय ९ तयार

0
339

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – चीनी स्मार्टफोन निर्माता शाओमीने यावर्षीच्या सुरुवातीला आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन एमआय ९ लॉन्च केला होता. प्रीमियम सेगमेंटमधील हा मोबाइल खूप लोकप्रिय झाला. आता या मोबाइलचे २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड व्हर्जन तयार करण्यात आले असून, स्वीडनच्या एका कंपनीने हे स्पेशल कस्टम एडिशन बनवले आहे.

गोल्डन कन्सेप्ट नामक स्वीडिश कंपनीने तयार केलेल्या या स्मार्टफोन लिमिटेड एडिशनच्या किंमतीबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. या कंपनीने आयफोनसाठी तयार केलेले कस्टमाइज केस, कव्हर सुमारे ४० हजार डॉलर म्हणजे जवळपास २८ लाख रुपयांपर्यंत विकले जातात.

आपला फोन कस्टमाइज करण्यामध्ये बड्या लोकांचा मोठा सहभाग असतो. त्यांना आपला मोबाइल कस्टमाइज करण्याची इच्छा असते. अनेक कंपन्या विविध मोबाइलसाठी कस्टमाइज केस, कव्हर तयार करतात. याच आधारावर शाओमीने एमआय ९ मोबाइलचे २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड व्हर्जन बाजारात येणार आहे.

या गोल्ड प्लेटेड कस्टमाइज मोबाइलची एक झलक समोर आली असून, फोनच्या मागील बाजूस ड्रॅगनचे डिझाइन असल्याचे दिसत आहे. हा मोबाइल कधी लॉन्च केला जातो आणि याची काय किंमत असेल, याबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झाली नसली, तरी याची उत्सुकता ग्राहकांमध्ये असल्याचे दिसून येतेय.