ह्या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा रद्द – राज ठाकरे

0
450
मुंबई, दि.१४ (पीसीबी) –  मेळाव्याला मोठ्या संख्येनं महाराष्ट्राभरातून लोक शिवतीर्थावर  जमणार आणि त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते याच पार्शभूमिवर गुढीपाडवा मेळावा आपण रद्द करत आहोत असे राज ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकात असे म्हटले आहे की दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीसाठी सर्वच महाराष्ट्र सैनिक जोरात आणि उत्साहात कामाला लागले होते. मात्र गेल्या दिवसांपासून आम्ही सर्वजण कोरोना साथीच्या बातम्या वाचून जरा चिंतेत होतो परिस्थिताचा अंदाज घेत होतो. ह्या परिस्थितीत गुढीपाडवा मेळावा कसा घ्यायचा असा प्रश्न आमच्या समोर होता. याच पार्श्वभूमिवर कोरोनाची साथ पसरू नये म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेच आहे. ती साथ रोखायची तर महत्त्वाचं काय तर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी टाळणं आणि आपल्या मेळाव्याला तर मोठी गर्दी होते. तयारीसाठी महाराष्ट्रात सैनिक ठिकठिकाणी बैठका घेतात. मेळावे आयोजित करतात आणि ह्या सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक जमा होतात. आज कोरोनाची साथ पसरू नये हे महत्त्वाच आहे. ह्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून लोक शिवतिर्थावर जमणार आणि त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता  ह्या गोष्टी फार महत्त्वाची आहेत म्हणून ह्या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा आपण रद्द करीत आहोत असे राज ठाकरे यांनी प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे.
सरकारनही उगाच तोंड देखील उपाय करण्यापेक्षा कोरोनाची साथ आटोक्यात येईलच अशी ठोस पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे.