सर्व बोर्डाच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील – आरोग्यमंत्री

0
609

मुंबई,दि.१५(पीसीबी) – सर्व बोर्डाच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. पूर्वनियोजित सर्व बोर्डांच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे त्या तारखेस होतील. अशा परीक्षेच्या दरम्यान कोणतेही आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांमध्ये मिक्स होणार नाही याची खबरदारी संबंधित शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था प्रमुखांनी घ्यायची आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज शाळांच्या संस्थाचालकांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संस्था आणि अंगणवाडी ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आलेला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, जिथे गर्दी होते अशा ठिकाणावर म्हणजे चित्रपटगृहे, मॉल्स, गिम्स, शाळा आहेत अशा ठिकाणांवर आम्ही बंदी घातली आहे, असंही त्यांनी सांगितलं.