ह्दयद्रावक: पुरंदरमध्ये नातवाला वाचवताना आजोबांचा विहिरीत बुडून मृत्यू

0
495

पुणे, दि. १७ (पीसीबी) – विहिरीत बुडत असलेल्या नातवाला वाचवताना आजोबाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही ह्दयद्रावक घटना गुरुवार (दि.१६) सकाळच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली

मारुती गेणबा गायकवाड (वय ६२) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास शेतातील विहिरीचे पाणी उपसण्यासाठी मारुती गायकवाड व त्यांचा नातू ओमराज संदीप शिंदे हे त्यांच्या विहिरीवर गेले होते. विहिरीचा पंप चालू करताना नातू ओमराज याचा पाय घसरून विहिरीत पडला. नातवाला पोहायला येत नसल्याने त्याला वाचविण्यासाठी आजोबा मारुती हे विहिरीत उतरले. नातवाला कसेबसे विहिरीच्या कडेला आणण्यात त्यांना यश आले. मात्र, मारुती गायकवाड हे विहिरीच्या तळाला गेले ते वर आलेच नाहीत. कपारीला बसलेला नातू विहिरीच्या बाहेर येण्यासाठी आवाज देत होता. हा आवाज रस्त्यावरून चाललेले रंगनाथ गायकवाड यांनी ऐकला आणि मारुती गायकवाड यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.