हे लोकशाही राष्ट्र आहे, इथे हुकूमशाही कारभार सहन केला जाणार नाही – सुप्रिया सुळे

0
709

मुंबई,दि.१८(पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन देशात अशांततेचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

हे लोकशाही राष्ट्र आहे. या देशात अशा पद्धतीचा हुकूमशाही कारभार सहन केला जाणार नाही. याबद्दल सर्वच पक्षांनी संसदेत सरकारला जाब विचारला पाहिजे, असं सुुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश केंद्रीय मंत्री देतात , याचा निषेध. या देशात विरोधी आवाज सुद्धा ऐकून घेऊन त्यांना आपलं मत पटवून देण्याचा इतिहास आहे. गोळीबार करुन काही हुकूमशाही प्रवृत्तींचा इगो सुखावेल पण तुम्ही जनतेचा आवाज दाबू शकणार नाहीत, असंही त्या म्हणाल्या आहेत.