प्रेरणादायी; कर्ज फेडण्यासाठी ८० वर्षाच्या माऊली विकतात पाणी पुरी

0
995

निगडी, दि.१८ (पीसीबी) – मुलाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी ८० वर्षीय माऊली पाणी पुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून अगदी तरुण ही लाजतील अशा प्रकारे ८० वर्षीय आजी काम करतात.

चंद्रभागा शिंदे असे ८० वर्षीय आजींचे नाव आहे.

काही महिन्यांपूर्वी चंद्रभागा यांचे पती माधव शिंदे यांचा अपघात झाला. त्यात त्यांना आपला पाय गमवावा लावला. मुलगा राजेंद्र यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली उसने, कर्जाने पैसे देखील घेतले आणि वडिलांवर तीन ते चार शस्त्रक्रिया केल्या. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे राजेंद्र यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले. त्याचे व्याज आणि मुद्दल आजही ते परत करत आहेत.