महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर मध्यरात्री गोळीबार

0
575

नागपूर, दि.१८ (पीसीबी) – महापौर संदीप जोशी कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता त्यांच्या वाहनावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हि घटना नागपूर शहारातील वर्धा रोड एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ घडली

मिळालेल्या माहितीनुसार, महापौर संदीप जोशी  कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. त्याच्या वाहनावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने महापौर संदीप जोशी या हल्ल्यातून वाचले. वाहनामधील कोणालाही दुखापत झाली नाही. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोरांनी पळ काढला. महापौर संदीप जोशी यांना १२ दिवसांपासून धमक्या देखील येत होत्या, अशी देखील माहिती समोर आली आहे. पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.