हे पांडुरंगा… आजी बाईंकडून दीड किलो गांजा जप्त

0
258

निगडी,दि.२३(पीसीबी ) – बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका वृद्ध महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून एक किलो 430 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

यशोदा बाबू पवार (वय 70, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सतीश ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम, निगडी येथील पेरूची बाग येथे एक वृद्ध महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारून एका वृद्ध महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 37 हजार 750 रुपयांचा एक किलो 430 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्या महिलेवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.