हेमा मालिनी मला आईच्या रुपात लाभल्या असत्या तर बरे झाले असते- ट्विंकल खन्ना

0
1413

मुंबई, दि. १० (पीसबी) – अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिचा जीवनप्रवास बॉलिवूडपासून सुरु केला आणि आता ती एका लेखिकेच्या रुपात साऱ्यांसमोर येत आहे. याविषयी तिने अनेकवेळा तिची मत मांडली असून नुकत्याच एका झालेल्या कार्यक्रमाध्ये तीने तिच्या आईबाबत एक आश्चर्यकारक मत मांडले आहे. ‘अभिनेत्री हेमा मालिनी मला आईच्या रुपात लाभल्या असत्या तर बरे झाले असते’, असे ती म्हणाली.

‘आतापर्यंत मी जे काही यश संपादित केले, त्या यशासाठी माझ्या आईने कधीच माझी पाठ थोपटली नाही. ती कायम माझ्या चुका शोधत राहिली. आजवर एकदाही तिने मला प्रोत्साहन दिलेले नाही. मी जेव्हा माझा पहिला कॉलम प्रसिद्ध झाला होता. तेव्हा माझा कॉलम वाचलास का असे मी आईला फोन करुन विचारले होते. मात्र माझा कॉलम तर तिने वाचला नाहीच. पण आदल्या दिवशी पार्टीमध्ये माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यावर चर्चा करत राहिली’, असे  ट्विंकल म्हणाली.

पुढे ती मजेशीर अंदाजात असेही म्हणाली, ‘डिंपल कपाडिया यांच्या जागी जर हेमा मालिनी आई म्हणून मला मिळाल्या असत्या तर बर झाले असते. त्या अनेक वेळा त्यांच्या मुलींची साथ देताना दिसतात. केंट वॉटर प्युरिफायच्या जाहिरातीतही त्या मुलीबरोबर झळकल्या आहेत. जर त्या माझ्या आई असत्या तर आज मला एक वॉटर प्युरिफाय मोफत मिळाला असता’. दरम्यान, ट्विंकलचे आतापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित झाली असून ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘मिसेज फनीबोन’ ही त्यांच्या लोकप्रिय पुस्तकांची नावे आहेत.