हिम्मत असेल तर मंत्रालय २४ तास चालू ठेव – निलेश राणे

0
493

मुंबई,दि.२१(पीसीबी) – किती टक्के लोकांना नाईटलाईफचा उपयोग होणार??? हिंमत असेल तर मंत्रालय २४ तास चालू ठेव. ती महाराष्ट्राची खरी गरज आहे, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटर द्वारे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

२६ जानेवारीपासून मुंबईतील अनिवासी भागातील हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स २४ तास सुरु राहणार आहेत. त्यासाठी मुंबईतील परिसरांची यादी करण्याची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी नाईट लाईफवरुन सरकार आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नाईट लाईफ बाबत पहिल्यांदा प्रस्ताव येणार आहे. यावेळी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यास वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे नाईट लाईफ अंतर्गत चोवीस तास सुरु ठेवता येणार आहेत.