मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या ‘त्या’ अपक्ष आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

0
354

नवी दिल्ली, दि, ८ (पीसीबी) – कर्नाटकातले जेडीयुकॉंग्रेसचे सरकार धोक्यात आले असून कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी १३ आमदारांनी, नंतर सरकारमधील एका अपक्ष मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे.

दरम्यान,आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे कर्नाटक सरकार अडचणीत आलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्ही एकाही बंडखोर आमदाराच्या संपर्कात नाही मात्र दरम्यान अपक्ष आमदार नागेश यांनी भाजपात प्रवेश केल्याचीही माहिती करंदलाजे यांनी दिली आहे.