हिंजवडीत शिवशाही बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
687

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – शिवशाही बसने दिलेल्या जोरदार धडकेत एका टेम्पोचालक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास हिंजवडी येथील मुंबई-बंगलोर महामार्गावर घडली.

अजय सिंग असे मृत टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, शिवशाही बसचालक उध्दव रामचंद्र नलावडे (वय ३४, रा. पिटवे वाटी, ता. जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास हिंजवडी येथील मुंबई-बंगलोर महामार्गावर उध्दव नलावडे यांनी त्याच्या ताब्यातील शिवशाही बसने टेम्पोचालक अजय सिंग यांना जोरदार धडक दिली. यामध्ये अजय यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.