…म्हणून ज्युनिअर असूनही मोदींना सर म्हणत होतो – चंद्राबाबू नायडू  

0
1126

हैदराबाद, दि. ३१ (पीसीबी) –  पंतप्रधान मोदी राजकाणात माझे ज्युनिअर  आहेत. मात्र, आंध्र प्रदेशच्या हितासाठी मी नरेंद्र मोदींचा अहंकार दुखावण्याच्या फंदात पडलो नाही. राज्याच्या भल्यासाठी मी शक्य ते सर्व करत आहे.  मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यावर मी त्यांना दहावेळा सर म्हणून संबोधले. जेणेकरून त्यांचा अहंकार संतुष्ट होईल आणि आंध्र प्रदेशला न्याय मिळेल, असा किस्सा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितला.

तेलुगू देसम पक्षाची बैठक आयोजित केली होती. यावेळी चंद्राबाबू बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जेव्हा मी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भेटीला गेलो होतो. तेव्हा तेव्हा मी त्यांना मि. क्लिंटन, अशी हाक मारली होती. मात्र, राजकारणात मला ज्युनिअर असलेल्या  मोदी यांना पंतप्रधान झाल्यावर मी दहावेळा सर म्हणून संबोधले. जेणेकरून त्यांचा अहंकार संतुष्ट होईल आणि आंध्र प्रदेशला न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.

२०१४ साली याच कारणासाठी मी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता भाजपची साथ सोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत टीडीपीला आणखी १० जागा मिळतील, असा विश्वासही चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, गेल्यावर्षी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या कारणावरून चंद्राबाबू यांनी ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.