हिंजवडीत जॅमरसहीत दोन वाहने पळवली; गुन्हा दाखल

0
1489

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – दुचाकी आणि रिक्षावर हिंजवडी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई करुन त्यांना जॅमर बसवले होते. मात्र या वाहनांच्या चालकांनी पोलिसांची नजर चुकवून चक्क पोलिसांनी लावलेल्या जॅमरसहीत दोनही वाहने पळवून नेली. हा प्रकार हिंजवडीतील जॉमेट्रिक चौकात घडला.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीच्या वाहतुक विभागाच्या पोलिसांनी दुचाकी (क्र.एमएच/१२/केएच/११९१) आणि ऑटो रिक्षा (क्र. एमएच/१२/जेएच/१७७०) या दोन वाहनांवर कारवाई करत त्यांना जॅमर लावले होते. मात्र वाहन धारकांनी जॅमरसहीत दोनही वाहने पळवून नेली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.