हिंजवडीत घरातील इलेक्ट्रीकचे काम करण्यासाठी आलेल्या इसमाने तरुणीवर केला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

0
612

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – घरातील इलेक्ट्रीकचे काम करण्यासाठी बोलावलेल्या इसमाने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील सांगरीया सोसायटी डी ब्लॉक ११०१ मेगापोलीस सोसायटी फेज ३ येथे घडली.

याप्रकरणी पिडित १८ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, धोनी उर्फ बालाजी शिंदे (वय ३५, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२० फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा ते साडेनऊच्या दरम्यान आरोपी धोनी हा पिडित तरुणीच्या घरातील काही इलेक्ट्रीकचे काम करण्यासाठी आला होता. यावेळी तरुणी घरात एकटीच होती. या गोष्टीचा फायदा घेत आरोपी धोनी याने तरुणीसोबत गंभीर गैरवर्तन करुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवेमारण्याची धमकी दिली. पोलिसांनी धोनी याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.