हार्दिक पटेल काँग्रेसकडून लोकसभा लढवणार?  

0
523

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करून  गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल १२ मार्चला पक्षप्रवेश करण्याची शक्यता  आहे.  

अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीवेळी हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हार्दिक पटेलने मोठे आंदोलन  उभे केले होते.   याचा फायदा काँग्रेसला होणार का? हे पाहावे लागणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या होम गाउंडवर ताकदीचे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे गुजरातमधून एकासएक  उमेदवार देण्याची काँग्रेसची रणनीती आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जामनगरमधून भाजपच्या पूनमबेन माडम निवडून आल्या आहेत.  काँग्रेसचे   विक्रमभाई अहिर यांचा  पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला होता.