राज ठाकरेंची शरद पवारांशी चर्चा; मनसे लोकसभा लढवणार नाही ?   

0
599

 मुंबई, दि. ७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचे पवारांना सांगितल्याच्या सूत्रांकडून समजत आहे.   

मनसेला केवळ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात रस आहे. लोकसभा निवडणूक लढण्यास मनसे इच्छुक नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, मनसे लोकसभा लढवणार नसली, तरी शिवसेना-भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी मनसे मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मुंबईतील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि युतीच्या सरकारविरोधात  महाआघाडीत येतील, त्यांना सोबत घेण्याचे सुतोवाच केले होते. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध केला आहे.