स्वयंपाकघरातील मोहरीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत…नसतील माहिती, तर जाणून घ्या..

0
267

स्वयंपाक घरातील मसाल्यामध्ये मोहरीचे स्थान हे असामान्य आहे. दिसायला जरी बारीक असली तरी आपल्या दैनंदिन जेवणातील कोणत्याही मसालेदार, तिखट पदार्थाची चव वाढवायची असेल तर त्यावर मोहरीचा तडका हा हवाच. कारण तडाक्याशिवाय जेवण अपूर्ण आणि मोहरीशिवाय तडका. अर्थात तडका म्हटलं की, डोळ्यासमोर पटकन येते ती, कडकडीत तापलेल्या तेलाची आणि मोहरीची फोडणी येते.

मोहरीला आयुर्वेदात सुद्धा महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात मोहरीचं किती महत्व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मोहरीचा प्रत्येक गुण घराघरातील प्रत्येक गृहिणीला माहिती असतो. मात्र मोहरी फक्त पदार्थाची चव वाढविण्यासाठीच उपयोगी नाही तर तिचे आणखी फायदे आहेत जे आपल्याला माहिती असणे खूप महत्वाचे आहे.

चला पाहुयात काय फायदे आहेत मोहरीचे…

१. पायात काच किंवा काटा गेल्यास त्या जागेवर मोहरीचं चूर्ण, तूप आणि मध एकत्र करुन त्याचा लेप लावावा.

२. अर्धशिशी, मस्तकशूळ उठल्यास मोहरी बारिक वाटून त्याचा लेप लावावा. यामुळे मायग्रेनचा त्रास असल्यास तो देखील बरा होतो.

३. दातदुखी, दात किडणे अशा समस्येवर गरम पाण्यात मोहरी उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे दातातील कीड मरते.तसंच हिरड्या मजबूत
होतात.

४. संधिवातात हात-पाय दुखत असल्यास एरंडाच्या पानाला मोहरीचं तेल लावून ते पान गरम करुन दुखत असलेल्या भागावर बांधून ठेवावं.

५. कान दुखत असल्यास मोहरीचे तेल गरम करून त्याचे दोन थेंब कानात टाकावे.

६. खाज, खरूज किंवा अन्य त्वचाविकार झाल्यास गोमूत्रामध्ये मोहरी वाटून त्यात थोडी हळद मिक्स करावी. हा लेप प्रभावित जागेवर लावावा. त्यानंतर
थोड्या वेळाने हा लेप पाण्याने धूवुन टाकावा.

७. तीव्र ताप, सर्दी, कफ झाल्यास मध आणि मोहरीचे चूर्ण एकत्र करुन ते चाटण घ्यावे.

८. मासिक पाळी नियमित येण्याकरता मोहरीचे चूर्ण घेत राहावे.

९. चामखीळ, मस असल्यास त्या जागी मोहरीचे तेल नियमित लावावे. चामखीळ, मस गळून पडतात.

१०. कान दुखत असल्यास मोहरीचे तेल गरम करून त्याचे दोन थेंब कानात टाकावे.

११. अपचन, पोटदुखी, अजीर्ण झाल्यास मोहरीचे चूर्ण आणि खडीसाखर एकत्र करुन पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे पोटाचे विकार किंवा अन्य समस्या दूर होतात.

( वरीलपैकी कोणतेही उपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)