स्वच्छता मोहिमेअंतर्गत 2 टन कचरा संकलित

0
279

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य आणि इनोव्हेटिव वर्ल्ड स्कूल यांच्या वतीने प्रभाग क्र 2 जाधववाडी चिखली येथील सिलव्हर जीम पासून स्वच्छता मोहिम आणि रॅलीचे आयोजन करणेत आले होते. या मोहिमेत सकाळी मॉर्निंगवॉकला येणारे शेकडो नागरिकांनी, ज्येष्ट नागरिक, इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, मनपा अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेध्ये सुमारे 2 टन कचरा संकलित करण्यात आला.

जाधववाडी चिखली येथील सिलव्हर जीम पासुन ते इनोव्हेटिव्ह वर्लड स्कूल रिव्हर रेसीडन्सी पर्यंत स्वच्छता मोहिमेची रॅली घेण्यात आली. या मोहिमेत चिखली परिसरातील रस्त्यावरील झाडलोट करण्यात आली. सोसायटी परिसरातील स्वच्छता करण्यात आली. रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी सूचना फलक परिधान केले होते, स्वच्छतेवर गणी, घोषणा देण्यात आल्या. सदरचे मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांनी दुकानदार नागरिक वाहनचालक इ. यांना स्वच्छतेचे महत्तव सांगितले तसेच प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन केले. तसेच दुकानदार, , नागरिक यांना स्वच्छता विषयक तसेच प्लॅस्टिक वापरणेवर बंदीबाबत जनजागृती केली. तसेच त्यांचेकडून प्लॅस्टिक जप्त करणेत आले. जाधववाडी चिखली ते रिव्हर रेसीडन्सी या ठिकाणचे ज्येष्ट नागरिक सहभागी होते. या मोहिमेनिमित्त क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी स्वच्छते विषयक व प्लॅस्टिक बंदी विषयक तसेच कचरा विलगीकरणाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितीतांना आपले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवणेस सहकार्य करावे असे आवाहन केले. सदर मोहिमेत सामाजिक स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या शाळएपासून ते आपल्या समाजापर्यंत राबविण्याचे धोरण आमच्या शाळेने सुरुवात केल्याचे संचालिका कमला बिष्ट यांनी सांगतीले.

सदर उपक्रमामध्ये क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहा. आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, श्री क्षितीज रोकडे, वैभव घोळवे तसेच मनपा अधिकारी आणि कर्मचारी तसेच इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कुलचे संस्थापक डॉ. संजय सिंग, प्रशांत पाटील, डॉ. अजित थिटे, मुख्याध्यापिका कमला ब्रिस्ट, शालेय शिक्षक, सुमारे ४५० विद्यार्थी यांचा सहभाग होता. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक जनजागृती पर संदेश दिले.