स्टॉक मार्केट मधून 30 टक्के नफा मिळवून देतो म्हणून नागरिकाची 30 लाखांची फसवणूक

0
85

स्टॉक मार्केटमधून 30 टक्के नफा मिळवून द्तो म्हणून एका नागरिकाची 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 18 डिसेंबर 2023 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हिंजवडी येथे घडली,.

याप्रकऱणी 44 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून विविध व्हॉटसअप ग्रुप, टेलिग्राम खाते, बँक खाते धारक अशा, दहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फेसबुकवर स्टॉक मार्केटची लिक आली. त्यावर फिर्यादी यांनी क्लीक करताच त्यांना एका व्हॉटसअप ग्रुपवर अड कऱण्यात आले. तेथे स्टॉक मार्केटमधून 30 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष देण्यात आले. पुढे वेगवेगळ्या खात्यावर गुंतवणूकीसाठी म्हणून फिर्यादी यांच्याकडून पैसे घेण्यात आले..मात्र फिर्यादी यांना त्यांची मुळ रक्कम व नफा न देता त्यांची 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. पैसे काढायचे असतील तर 10 टक्के टॅक्स भरावा लागेल सांगत एक खासगी क्रमाक दिला आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.