स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांना अटक : गृहमंत्री अनिल देशमुख

0
214

पिंपरी,दि.१४ (पीसीबी) : स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. काही जणांनी सोशल मीडियावरून जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत असतानाच याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे .

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून एका कार्यक्रमात विनोदी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. दरम्यान, या वक्तव्यानंतर काही जणांनी सोशल मीडियावरून जोशुआवर असभ्य भाषेत टीका करून तिला ट्रोल हि केलं होत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. जोशुआविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कायदेशीर सल्ल्यानंतर कारवाई…

“अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहेत. चौकशीमध्ये अग्रिमा जोशुआ दोषी असल्याचं आढळून आल्यास तिच्यावरही कारवाई केली जाईल,” असं देशमुख म्हणाले.

याविषयी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,”अग्रिमा जोशुआ हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल केले होतं. त्यासंदर्भात कारवाई करण्याआधी स्थायी समितीची कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्याचबरोबर एका महिलेवर आक्षेपार्ह टीका टिप्पणी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. उमेश जाधव व इम्तियाज शेख यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी आक्षेपार्ह टीका व पोस्ट करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी अशा सर्वांची यादी तयार केली आहे. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल,”अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.