सोसायटीच्या बाहेर फुले वेचणं महिलेला पडलं महागात. काय झालं पहा..

0
227

पिंपरी, दि.13 (पीसीबी) : सोसायटीच्या बाहेर फुले वेचत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे पाच ते सव्वा पाच वाजताच्या सुमारास रस्टन कॉलनी, प्राधिकरण निगडी येथे घडली.

गीता मोहन भुजंग (वय 75, रा. रस्टन कॉलनी, प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुजंग रस्टन कॉलनी, प्राधिकरण निगडी येथे सोसायटीच्या बाहेर झाडाची पडलेली फुले वेचत होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यात हात घालून गळ्यातील दीड तोळे वजनाची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबदस्तीने हिसकावून नेली. त्यानंतर चोरटे पळून गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.