फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पंगतीत आता शरद पवार साहेबसुद्धा आहेत – जयंत पाटील

0
330

शरद पवार आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत विराजमान- जयंत पाटील

मुंबई,दि.१३(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी वयाच्या 81 व्या वर्षात पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम- सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा विराजमान झाल्याचे ट्विट जयंत पाटील यांनी केले.

२०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी शरद पवार नावाचा करिष्मा बघितला आहे. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा ‘बाप आला‘ असे म्हणत लोकांनी साहेबांचे राज्यभर स्वागत केले, त्यांचे नेतृत्व स्वीकारले. ‘शरद पवार जी कि राजनीती का दौर अब शुरू हुआ है’ हे विरोधकांनी जाणावे, असा इशाराही यावेळी जयंत पाटील यांनी दिला.

दरम्यान महाराष्ट्राच पक्ष वाढीची जबाबदारी माझ्यावर आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यात प्रभावीपणे पोहोचायचं आणि भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेच्या पाठी उभे राहयचं यासाठी मी आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहे असंही जयंत पाटील म्हणाले.