सोनू सूद म्हणतो…उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे

0
328

मुंबई,दि.१०(पीसीबी) – उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे, असं वक्तव्य अभिनेता सोनू सूद याने एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सोनू सूदवरील बोचऱ्या टीकेनंतर त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खूप सपोर्टिव्ह आहेत. काहीही मदत लागली तर नक्की सांगा… आम्ही लागेल ती मदत करू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सोनूने सांगितलं. त्यांनी आताही मजुरांना घरी पाठवण्यासाठी मदत केली आहे. त्यांचं खूप सहकार्य लाभलं आहे. म्हणून मी त्यांचे आभार मानू इच्छितो, असं सोनू म्हणाला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना सोनू म्हणाला, “संजय राऊत खूप वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहेत. त्यांच्या विचारानुसार त्यांनी माझ्यावर टीका केली. परंतू त्यानंतरही माझं काम मी बंद केलं नाही. किंबहुना आजही मजुर गावाकडे पाठवण्याबाबत माझे प्रयत्न चालू आहे.”