सुळे निवडून आल्या, तर इव्हीएम चांगले; पण मुंडेंची मुलगी निवडून आल्यावर खराब कसे? – मुख्यमंत्री

0
532

बीड, दि. २७ (पीसीबी) – शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे निवडून आल्या, तर इव्हीएम चांगले.  मात्र गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रतीम मुंडे निवडून आल्यावर  इव्हीएम मशीन खराब, असा कांगावा विरोधक करत आहेत, असा टोला मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा  बीड येथे पोहचली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  इव्हीएमवर खापर फोडणाऱ्या  विरोधकांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री म्हणाले की, २००४ पासून २०१४ पर्यंत प्रत्येक निवडणूक इव्हीएमवर झाली. तेव्हा विरोधकांचे सरकार सत्तेवर होते. तेव्हा इव्हीएममध्ये कोणताच दोष नव्हता. मात्र मोदी सरकार येताच इव्हिएम हे खराब झाले. मात्र इव्हीएम खराब नसून विरोधकांचे डोके खराब आहेत. त्यमुळे ते आता जनतेतून नेस्तनाबूत होत आहेत, असा टोला  त्यांनी लगावला.