सुरुवातीचे कल महागठबंधनच्या बाजूने; निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भाजप सर्वात पुढे

0
210

पाटणा,दि.१०(पीसीबी) – बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सुरुवातीचे कल महागठबंधनच्या बाजूने असल्याचं सर्व माध्यमांवर दिसत आहे. पण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भाजप सर्वात पुढे असल्याचं दिसून येत आहे.

निवडणुकीच्या पहिल्या 43 जागांचे कल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. यामध्ये भाजप सर्वाधिक 15 जागांवर पुढे असल्याचं दिसत आहे. पाठोपाठ राजद 9 आणि जनता दल 8 जागांवर आघाडीवर आहे. तर कांग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा 122 इतका आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही बाजूच्या पक्षांना शंभरपेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं दिसत आहे. एकूणच बिहारमध्ये सध्यातरी तुल्यबळ लढत चालू आहे.