सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग

0
306

नागपूर, दि. २८ (पीसीबी) : वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.

आरोपी डॉक्टरला अटक
पीडित डॉक्टरच्या तक्रारीनंतर डॉक्टर नंदू रहांगडाले यांच्यावर मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

औरंगाबादेत कोरोनाग्रस्तावर डॉक्टरचा अतिप्रसंग
दरम्यान, रात्रीच्या वेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने कोरोनाबाधित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उघडकीस आला होता. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तिथून पळ काढला होता.