गुटख्याची वाहतूक करणा-यास अटक

0
206

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – गुटख्याची वाहतून करणाऱ्या एकाला हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 27 हजार 588 रुपयांचा गुटखा आणि दुचाकी असा 62 हजार 588 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रामचंद्र भवरदास वैष्णव (वय 36, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैष्णव हा दुचाकीने गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी म्हाळुंगे येथील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून त्याला अटक केली. त्यावेळी पोलीसांना त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत 27 हजार 588 रुपयांचा गुटखा मिळून आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.