सिगारेट विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले

0
222

तळेगाव दाभडे, दि.14 (पीसीबी) : खानावळीत काम करत असलेल्या महिलेकडे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी सिगारेट आहे का, असे विचारले. महिलेने सिगारेट नसल्याचे सांगितले आणि तिच्या कामाकडे वळली. त्यावेळी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे घडली.

संगीता तुकाराम तुमकर (वय 43, रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वारंगवाडी येथील खानावळीत काम करतात. शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्या खानावळी मध्ये काम करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे सिगारेट आहे का असे विचारले. त्यावर फिर्यादी यांनी सिगारेट नसल्याचे सांगितले आणि त्या त्यांच्या कामासाठी मागे वळल्या. त्यावेळी दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.