सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पालिकेतर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम

0
173

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वांच्या समन्वयाने तसेच सकारात्मक पद्धतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून शेवटच्या घटकापर्यंत याबाबत माहिती पोहोचविण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, संघटनाच्या प्रतिनिधींनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी केले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा तसेच विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही देखील महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, माहिती तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे, प्रभारी शिक्षण अधिकारी रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, बापूसाहेब गायकवाड, देवेंद्र तायडे, विशाल जाधव, धम्मराज साळवे, विनोद गायकवाड, अनिरुद्ध सूर्यवंशी, संतोष शिंदे, संजय बनसोडे, गोकुळ चव्हाण, भारत चंदनशिवे, बाळासाहेब चंदनशिवे, बुद्धदेव साबळे, विकास कडलग, प्रवीण कांबळे, राजेंद्र साळवे, सतीश काळे, आनंदा कुदळे, दामू चंदनशिवे, गिरीश वाघमारे, आकाश शिंदे, शंकर लोंढे, आकाश लोंढे, राजू सरोदे, दिलीप देहाडे, राजन नायर, ईश्वर कांबळे, विशाल कांबळे, विजय ओव्होळ, गोरख गवळी, धनंजय कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकूरे, अॅड.विद्या शिंदे, मेघना सुसम, निवेदिता बडवे, वंदना जाधव, मेघा आठवले, भारती गवळी यांच्यासह सहायक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, प्रफुल्ल पुराणिक, विनोद सकट तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या नियोजन बैठकीत उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या. प्रबोधन कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ भेट न देता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर तसेच कार्यावर आधारित असणाऱ्या कविता संग्रह किंवा पुस्तक द्यावे, कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण व्हावे, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा उपलब्ध करून देण्यात यावा, कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी, कार्यक्रम एकाच ठिकाणी न घेता प्रत्येक प्रभागात कार्यक्रम घेण्यात यावा, शहरातील शाळा तसेच महाविद्यालयांच्या स्तरावर सावित्रीबाई फुले जयंती दिन साजरा करण्याबाबत आवाहन करावे, शहरातील महापालिकेच्या तसेच इतर शाळांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून विविध स्पर्धा घेण्यात याव्यात, विविध माध्यमांचा वापर करून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करावा, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवावेत, कविसंमेलन आयोजित करावे, कार्यक्रमामध्ये शहरातील विविध बचतगटांतील महिलांना सहभागी करून घ्यावे, चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे, यशस्वी महिला तसेच महिला बचतगटांना सन्मानित करण्यात यावे, सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा जागर करण्यासाठी परिसंवाद तसेच शालेय स्तरावर निबंध आणि वकृत्त्व स्पर्धा आयोजित कराव्यात, कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध माध्यमातून जाहिरात करावी, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे आदी सूचना उपस्थितांनी बैठकीत मांडल्या.

उपस्थितांकडून करण्यात आलेल्या योग्य सूचनांचा अंतर्भाव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल. नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी केले.

या बैठकीचे प्रास्ताविक विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी तर प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.