साताऱ्याच्या विकासात राजकारण करणाऱ्याला सोडणार नाही; उद्यनराजेंची दमबाजी

0
447

सातारा, दि. ८ (पीसीबी)- सातारा शहराच्या विकासामध्ये राजकारण आणून कोणी ठेकेदारांना दमबाजी करत असेल, तर त्याला सोडणार नाही, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार उद्यनराजेंनी दम भरला आहे.

साताऱ्यातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ काल उद्यनराजेंच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमातच राजेंना राष्ट्रवादीच्या तिकीटाबाबत विचारले असता, माझे तिकीट मी आधीच काढलयं. एकच तिकीट असते, जो जन्माला आला, त्याचे. माझे तिकीट आत्ताच काढू नका, सेवा करण्याची संधी द्या, असेही ते मिष्किलपणे म्हणाले.

आपण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याचे उद्यनराजेंना विचारले असता, त्यांनी या प्रश्नाला उत्तर न देताचे सातारकरांन प्रश्नांकित ठेवले.