हिंजवडीतील कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेला ४२ हजारांचा गंडा

0
394

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – हिंजवडी येथील एच.सी.एल टेक्नॉलॉजी या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देते असे एकूण दोघा ठग महिलांनी एका २७ वर्षीय तरुणीला ४२ हजार ६०० रुपयांचा गंडा घातला. ही घटना मंगळवार (दि.२९ मे) २०१८ ते शनिवार (दि.९ जुन) २०१८ या दरम्यान घडली.

याप्रकरणी राजलक्ष्मी सिंग (वय २७, रा. शिवराजनगर कॉलनी, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पुजा शर्मा आणि जसप्रित सिंग नावाच्या दोन तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.२९ मे) २०१८ ते शनिवार (दि.९ जुन) २०१८ या कालावधीत आरोपी पुजा आणि जसप्रित या दोघींनी राजलक्ष्मी यांना फोन करुन हिंजवडी येथील एच.सी.एल टेक्नॉलॉजी या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आश्वासन दिले होते. तसेच कामाला लावण्यासाठी राजलक्ष्मी यांच्याकडून वेळोवेळी दोघा आरोपींनी ऑनलाईन माध्यमाव्दारे एकूण ४२ हजार ६०० रुपये घेतले. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपींनी राजलक्ष्मी यांना नोकरी तर दिली नाहीच तसेच त्यांचे पैसे देखील परत केले नाहीत. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच राजलक्ष्मी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.