सांगवीत लग्न झालेल्या प्रियसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराचा सपासप वार करुन खून

0
675

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – लग्न झालेल्या प्रियसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराचा, प्रेयसीच्या पतीने धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.१६) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान जुनी सांगवी ढोरेनगर येथील पटेल रेजन्सी येथे घडली.

अशोक लक्ष्मण बिरादार (वय ३२, रा. पारखेवस्ती, सुसगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ गुरुबाळप्पा लक्ष्मण बिरादार (वय ४२, रा. बावधन) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लक्ष्मण तुकाराम खुटेकर (वय ३०, रा. पटेल रेजन्सी, ढोरेनगर, जुनी सांगवी) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अशोक आणि सुमर यांचे प्रेम संबंध होते. सुमर हीचा लक्ष्मण खुटेकरसोबत विवाह झाला होते. मंगळवार रात्री आठ ते नऊच्या दरम्यान आशोक हा जुनी सांगवी ढोरेनगर येथील पटेल रेजन्सीमधील सुमरला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी पती लक्ष्मण खुटेकर यांना त्यांचा संशय आला त्याने धारदार शस्त्राने अशोक याच्या दोन्ही हातांच्या मनगटांवर, मानेवर, डोक्यात, बोटांवर आणि हनुवटीवर वार करुन त्याचा खून. घटनेची माहिती कळताच अशोकचा भाऊ गुरुबाळप्पा याने सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी लक्ष्मण याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.वाय.पाटील तपास करत आहेत.