सांगवीत बिबट्याचा वावर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
699

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – सांगवी परिसरातील सीक्युएईमध्ये बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सांगवी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी सीक्युएईमध्ये सोमवारी बिबट्या दिसल्याच सांगण्यात येत असून त्या संदर्भात सीक्युएई प्रशासनाकडून लेखी परिपत्रकाद्वारे स्थानिक रहिवासी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुळा नदी लगत नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सीक्युएईमध्ये लष्कर आणि संरक्षण विभागासाठी उपकरणे आणि रसायने बनवली जातात. सोमवारी मुळा नदी जवळ बिबट्या दिसल्याच तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.