सांगवीतील अजित भोईया खून प्रकरणी आरोपीस अटक

0
1271

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – सांगवीतील कामगार वसाहतीजवळ मंगळवारी (दि. ३१) अजित नंदकुमार भोईया (वय २८, रा. कामगार वसाहत, सांगवी. मू.रा. झारखंड) या तरुणाच्या डोक्यात दगड मारुन तसेच धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. किरकोळ वादातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनिल महावीर खडिया (वय २६, रा. कामगार वसाहत, सांगवी. मू.रा. झारखंड) याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सांगवीतील कामगार वसाहतीजवळ खून झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी अनिल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता अनिल आणि अजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून त्याने अजित याच्या डोक्यात दगड मारून तसेच वार करून खून केला, असल्याची कबुली दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.