सांगली; पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांची निर्घुण हत्या

0
332

सांगली, दि.७ (पीसीबी) – सांगली जिल्ल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांची बुधवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली.

सांगली जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या खुनाचे सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येचा उलगडा होत नाहीत तोच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मनोहर पाटील हे पंचायत समितीचे माजी सभापती होते. शेतात काम करत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोहर पाटील यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनोहर पाटील यांच्यावर बुधवारी संध्याकाळी हा हल्ला करण्यात आला होता. हत्ये मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढचा तपास पोलीस करत आहेत.